मुंबई/ पुणे: राज्यातील करोनाबाधित ( ) रुग्णांचा आकडा आज, रविवारी वाढला. त्यामुळे चिंता कायम आहे. आज राज्यात करोनाचे ३, ३१४ नवे रुग्ण आढळले. तर ६६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आज, रविवारी २,१२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १८,०९,९४८ वर पोहोचला आहे. राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२९ % एवढे झाले आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारीच आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ३३१४ नवीन करोना रुग्ण सापडले आहेत. तर ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर हा २.५७ टक्के इतका आहे.
आजपर्यंत १,२५,०२,५५४ प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी १९,१९,५५० (१५.३५ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५७,३८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत; तर ३,३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.